लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत असतानाच राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णात काहीशी वाढ झाल्याचे चित्र दिसले. म्हणून शासनाने काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन अर्थात लोकलसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तथापि, पालिकेने पुढील आठवड्यात ही सेवा सुरू होईल, असे संकेत दिले आहेत.
मुंबई शहरात कोरोना रुग्णांची स्थिती कशी आहे, याचे निरीक्षण पालिकेकडून केले जात आहे. यासाठी पालिकेने 15 दिवसांची मुदत निर्धारित केली असून ही मुदत येत्या रविवारी म्हणजे, 21 फेब्रुवारीला पूर्ण होत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात येईल. त्याआधारेच मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
विशेष म्हणजे, गेल्या 15 दिवसांत राज्यामध्ये कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढली आहे. याबाबत चिंता व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, आवश्यकतेनुसार पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे औरंगाबाद येथे आज (15 फेब्रुवारी) सांगितले. तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
Comments
Loading…