in ,

‘पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा’

कोरोना संकटात पत्रकार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक राज्य सरकारांनी पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून घोषित केले आहे. यात मध्य प्रदेशसह पश्चिम बंगाल सरकारचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अशी मागणी होऊ लागली आहे.

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून घोषित करा, असंही थोरात यांनी म्हटलं आहे. पत्रकार नेहमी घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच पत्रकारांच्या कुटुंबीयांनाही धोका संभवू शकतो, असंही थोरात म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेमडेसिव्हीर, ऑक्सिजनच ग्लोबल टेंडर काढणार- राजेश टोपे

अनिल देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कॉल रेकॉर्डिंगची CBI करणार तपासणी