in ,

आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूकच…राहुल गांधींचे मोठे विधान

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीच्या अनेक वर्षानंतर यावर टीकास्त्र सुरूच आहे. आता या आणीबाणीवरचं इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठे विधान केले आहे.

आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. कॉर्नेल विद्यापीठातील एका कार्यक्रमात प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादा दरम्यान ते बोलत होते.

देशातील वर्तमान सरकारकडून प्रसारमाध्यमांपासून न्याय प्रणालीपर्यंत वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील राहुल गांधी यांनी भाजपवर केला. यावेळी राहुल गांधी यांनी उदाहरणाखातर मणिपूरचे राज्यपाल भाजपची मदत करतायत व पुदुच्चेरीच्या उपराज्यपालांनीही अनेक विधेयक मंजूर होऊ दिली नसल्याचा दावाही केला आहे. तसेच भाजप सरकार लोकशाही प्रणालीचे मोठे नुकसान करत आहे. भारतातील संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याच्या घणाघाता करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत असल्याची टीका केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ।।’ सेलिब्रिटिंजच्या ट्विटमागे भाजपा, काँग्रेसकडून पुनरुच्चार

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओची बाजी