in

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : रेड्डी व शिवकुमारला वनसेवेतून बडतर्फ करा महिलांची मागणी

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात रेड्डी व शिवकुमारला वनसेवेतून बडतर्फ करा अशी महिलानी मागणी केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महीला वन अधिकारी दिपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी DFO विनोद शिवकुमार यांना 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश धारणी न्यायालयाने दिले आहेत. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात रेड्डी व शिवकुमारला वनसेवेतून बडतर्फ करा अशी महिलानी मागणी केली आहे.  

DFO शिवकुमारला फाशी द्या, शिवकुमार मुर्दाबाद, PCCF रेड्डीला सह आरोपी करा अशी यावेळी मागणी केली.  शिवकुमार यांना धारणी पोलिसांनी न्यायालयात पोलीस व्हॅनमधे न नेता पायी न्या अशी मागणी देखील यावेळी महिलांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदी साधणार आज जनतेशी ‘मन की बात’

मुंबईकरांनो यंदा धुळवड खेळायला गेलात तर पोलिसांकडून होणार कारवाई