म्यानमार लष्कराच्या मुख्य पेजवर फेसबुकने कारवाई केली आहे. हिंसाचारास उद्युक्त करण्याच्या मानदंडांनुसार लष्कराचे पेज डिलीट केलं आहे.
म्यानमारच्या लष्कराला टाटमॅडॉ म्हणून ओळखले जाते. रविवारी 21 फेब्रुवारी रोजी त्याचे ट्रू न्यूज पेज फेसबुकवर दिसणे बंद झाले आहे. दरम्यान, म्यानमार लष्कराच्या प्रवक्त्याने याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
शनिवारी म्यानमारच्या दुसरे शहर मंडाल्यात दोन लोक ठार झाले. पोलिस आणि सैनिकांनी औंग सॅन सू यांच्या सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर गोळीबार केला. यात दोन आंदोलक ठार झाले आहेत. दोन आठवड्यांहून अधिक काळापासून हा संघर्ष सुरु असल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.एक फेब्रुवारीला पोलिसांच्या गोळीबारात दोन आंदोलक ठार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
Comments
Loading…