in

दिल्ली बाटला हाऊस चकमक, आरीझ खान दोषी

सप्टेंबर 2008 मध्ये दिल्लीच्या बाटला हाऊस एन्काऊंटरप्रकरणी दिल्ली न्यायालयाने सुमारे 12 वर्षांनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी आरीझ खान याला सोमवारी दोषी ठरवले. आरीझ खानचे दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. फिर्यादींनी दिलेल्या पुराव्यांवरून हा खटला सिद्ध झाला आहे आणि आरोपी दोषी आहे यात काही शंका नाही.

हे सिद्ध झाले आहे की, आरोपी आरीझ खान शूटआऊटदरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याला कोर्टात हजर होण्याचा आदेश देऊनही तो हजर झाला नाही. त्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. 15 मार्च रोजी कोर्टाची शिक्षा किती प्रमाणात होईल यावर युक्तिवाद सुनावणी होईल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी निकाल जाहीर करताना सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लग्नसमारंभ, लोकलगर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढला

रात्री १० पर्यंत कोरोना लसीकरण करू द्या; बॉम्बे हॉस्पिटलची बीएमसीकडे विनंती