in

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 6 संशयित ताब्यात

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण सहा संशयित ताब्यात घेतले आहेत. संशयित हे दहशतवादी मॉड्यूल भारतात चालवत होते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याची योजना होती. दरम्यान, या सर्वांची सतत चौकशी केली जात आहे. पोलीस उपायुक्त, प्रमोद कुशवाह यांनी ही माहिती दिली.

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे छापे टाकले आणि एकूण ६ जणांना अटक केली. या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलसाठी काम करणाऱ्या ६ पैकी २ जणांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघांची नावे ओसामा आणि जिशान अशी आहेत. यातील दोन संशयित दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य दोन पाकिस्तानींच्या सांगण्यावरून काम करत होते. त्यांचा हेतू नवरात्र आणि इतर सणादरम्यान हल्ला करणे होता. त्यांच्याकडून आईईडी देखील जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांचे वय २२ ते ४३ वर्षांच्या दरम्यान सांगितले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- अनिल परब

‘केवळ आश्वासन नाही…दिलेले शब्द पाळतो’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला