लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असणारे आंदोलन तापत असतानाच, आता टूलकिट हे नवीन प्रकरणी समोर आले आहे. टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिस वेगवान पद्धतीने तपास करत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर, आता सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहे. तर, दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या संदर्भात दिल्ली पोलिसांनी माध्यमांनी संवाद साधत त्यांची बाजू स्पष्ट केली. प्रजासत्ताक दिनी ‘ट्विटर स्टॉर्म’ निर्माण करण्याचा आरोपींचा उद्देश होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी निकिता जेकब व शांतनु विरोधात अजामानिपत्र वॉरंट काढले आहे. टूलकिट प्रकरणात पोएटीक जस्टिस फाउंडेशनचा देखील सहभाग आहे. शेतकरी आंदोलन वाढवण्याकरीता जानेवारीमध्ये हे टूलकिट बनवण्यात आले होते. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या मते ११ जानेवारी रोजी झूम मिटींग करण्यात आली होती. या मिटिंगमध्ये निकिता, शांतनु आणि दिशा सहभागी झाले होते. या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं होतं की २६ जानेवारी रोजी ट्विटर स्टॉर्म निर्माण केलं जाईल. या झूम मिटिंगमध्ये जवळपास ६० ते ७० जणं सहभागी झाले होते.
Comments
Loading…