in

Delhi Unlock | सोमवारपासून दिल्लीत अनलॉक सुरू

देशात कोरोनाची दुसरी लाट असतानाच दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव देशात अजूनही सुरू आहे. मात्र, आता कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत आता कोरोनाच्या नवीन केसेस मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. हे पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज हळूहळू दिल्ली अनलॉक करण्याची घोषणा केलीय. जनतेच्या मागणीनुसार आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे आम्ही हळूहळू लॉकडाऊन उघडण्याची प्रक्रिया सुरू ठेवू, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट असतानाच दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्लीत कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. गेल्या 24 तासात संसर्ग दर 1.5% झाला आहे आणि कोरोनाची सुमारे 1100 रुग्णांची नोंद झाली आहे. “कोरोनाविरूद्ध लढाईत दिल्लीकरांनी केलेल्या कठोर परिश्रमांमुळे दिल्लीतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे, लॉकडाऊननंतर दिल्ली हळूहळू अनलॉक करण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळपासून बांधकाम क्षेत्र व कारखाने सुरू केले जाणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जाणून घ्या कलम ३४२ अ नेमकं आहे तरी काय? मराठा आरक्षणासोबत त्याचा नक्की संबध काय?

३० जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद