in

डेलकर आत्महत्या: सिल्वासा जिल्हाधिकाऱ्यांच्या याचिकेवर आज सुनावणी

दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सिल्वासाचे जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनी उच्च न्यायालयात बुधवारी याचिका दाखल केली होती.या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

सिंह यांनी याचिकेद्वारे डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला आव्हान दिले आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा अर्थहीन असून तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप याचिकाकत्र्यांच्या वतीने करण्यात आला.

प्रकरण काय ?

मोहन डेलकर यांनी मागील महिन्यात मरिन ड्राइव्ह येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. तसेच त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवली होती. त्यात दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल व जिल्हाधिकारी संदीपकुमार सिंग यांच्याबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी, मामलतदार, सिल्वासाचे पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक, स्टेशन हाऊस ऑफिसर व फत्तेसिंग चौहान नावाचा खासगी व्यक्ती यांनी माझ्या कॉलेजवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतुने माझी खूप छळवणूक केली, असे मोहन डेलकर यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांचा मुलगा अभिनव डेलकर याने लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यपाल देहरादूनला रवाना; महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट रद्द

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची उद्या भारत बंदची हाक