in ,

लोकशाही’च्या स्पेशल स्टोरीचा दणका ! पाटण प्रशासन खडबडून जागं

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात ढगफुटी झाल्याने केरा नदी तुडुंब वाहत होती त्यामुळे केरा नदी मुख्यप्रवाह सोडून दुसऱ्या मार्गाने वाहत होती.यामुळे पाटण तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले. शेतातही पाणी शिरल्याने शेततली माती मात्र वाहून गेली. या विरादक परिस्थितीचे चित्रण ‘लोकशाही’च्या खास कार्यक्रम असलेल्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते.

शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा वेध घेणार स्पेशल रिपोर्ट प्रसारित होताच पाटण प्रशासन खडबडून जागं झालं आणि पाटण तालुक्यात ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास तात्काळ सुरुवात करण्यात आली.

सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातील प्रमुख पिक म्हणजे भात. यावरचं वर्षभर शेतकऱ्यांना आपलं पोट भरावं लागतं.आणि त्यातूनचं काही अंशी विक्री करुन शेतकरी आपली नगदी गरज भागवतात. मात्र, कोरोना संकटाच्या या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे मोलमजुरी बंद आहे.. पाटण तालुक्यातील नोकरीच्या निमित्तानं मोठ्या शहरांमध्ये गेलेले तरुण देखील गावी परतले आहेत.अशातच कुटुंब चालवायचं आणि कर्ज काढून शेती करायची, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालीय.यामध्ये निसर्ग संकटानं गाठलं आणि पाटणमधल्या शेतकऱ्यांना ढगफुटीचा सामवा करावा लागला. शेतकऱ्यांची पिक डोळ्या देखत वाहून गेली.शेतातील दगडाचे बांध देखील वाहून गेले.

पाटण तालुक्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या या संपूर्ण परिस्थितीचा लोकशाही न्यूजनं आढावा घेतला. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची परिस्थिती लोकशाहीनं दाखवली. या स्पेशल रिपोर्टची दखल घेत प्रशासनानं तात्काळ नुकसानीचे पंचनामे सुरु केले. लोकशाहीच्या स्पेशल स्टोरीमुळे झालेल्या इम्पॅकटसाठी शेतकऱ्यांनी लोकशाही न्यूजचे आभार मानले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अशी साजरी केली सोनाली कुलकर्णीने पहिली वटपौर्णिमा

आमदार निलेश लंकेंची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद