in

वाहन चालकांऐवजी नगरपरिषदेकडून दंड वसूल करण्याची मागणी

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दिवसेंदिवस दुरावस्था होत आहे. नगरपरिषदेने अनेक ठिकाणी पाण्याच्या योजनेसाठीच्या पाईपसाठी खोदाई केली असून त्यानंतर मात्र हे चर व्यवस्थितरित्या बुजविण्यात आलेले नाहीत.

अनेक ठिकाणी खोदलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करणे शक्य होत नाही.वाहनचालकांनी खोदलेल्या चराच्या बाजूला वाहने उभी केल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ फोटो काढून दंडाची कारवाई केली जात आहे. यामुळे वाहन चालकांच्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

रत्नागिरीतील वाहनचालकांकडून २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. त्यामुळे हा वाहन चालकाचा दोष आहे की रत्नागिरी नगरपरिषदेचा? याकडे कोणीही लोकप्रतिनिधी ढुंकून पाहण्यास तयार नाहीत.नगरपरिषदेने हे खोदलेले चर व्यवस्थित केले असते तर अनेक दुचाकी व अन्य वाहनांना रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करता आली असती.

मात्र ते न झाल्याने ते नगरपरिषदेने न केलेल्या कामाचा फटका दंडाच्या स्वरूपात विनाकारण वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे नियमावर बोट ठेवून दंड आकारणार्‍या वाहतूक पोलिसांनी नागरिकांऐवजी जोपर्यंत रस्ते नगरपरिषद सुस्थितीतआणत नाहीत तोपर्यंत नागरिकांऐवजी नगरपरिषदेकडूनच दंडाची वसुली करावी अशी नागरिकांकडून मागणी पुढे येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीपाद छिंदमला पोलिसांकडून अटक

Sonu Sood | अभिनेता सोनू सूदशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची पाहणी