in

‘KGF 2’चे प्रदर्शन लांबणीवर? जाणून घ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

कन्नड सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘केजीएफ चॅप्टर १.’ तुफान यश आणि लोकप्रियता मिळालेल्या या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा देशात करोनाची तिसरी लाट आल्यचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा ‘KGF 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचे म्हटले जात होते. पण प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘KGF 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली आहे. ‘KGF 2 हा चित्रपट ठरलेल्या दिवशी १४ एप्रिल २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली नाही. यशच्या वाढदिवशी चित्रपट प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे ट्वीट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भूल भुलैया २’मध्ये ‘ही’ अभिनेत्री असणार मोंजोलिका

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन प्रकरण; विधानभवनात होणार सुनावणी