in

अमरावतीत डेंग्यूचे तांडव; तिवसामध्ये सहा दिवसात तीन बालकांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात गेल्या सहा दिवसात तीन बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये लहान बालकांना सर्वाधिक डेंग्यूने ग्रासलं आहे. तिवसा येथील देवांश वाट वय१८,अजय रेवतकर वय८ वर्ष व कृष्णा देशमुख वय १३ वर्ष या तीन बालकांना डेंग्यूमुळे जीव गमवावा लागला.

सहा दिवसात डेंग्यूने मृत्यू झाला आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात महिनाभरात ४०रुग्ण डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले आहेत. तसेच अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरात २०दिवसापासून डेंग्यूचे तांडव सुरू आहे. या ठिकाणी २५०रुग्ण डेंग्यू सदृश्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

येथे दहा डेंग्यू टेस्ट मध्ये सात डेंग्यू पॉझिटिव्ह निघत असल्याने आता कोरोना नंतर हे नवीन संकट अमरावतीत निर्माण झाले आहे. तिवसा शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं असून दूषित व नियमित पाणी पुरवठा होत नाही. तसेच फवारणी नियमित केली जात नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“…पण माझा तर हनिमून झाला” जालन्यात दानवेंची फटकेबाजी

शाळा वाचवण्यासाठी भंडाऱ्यात कॅन्डल मार्च