in

“देशमुखांची सून ” जिनिलियाचा मराठी उखाणा

प्रेक्षकांच्या पसंदीचा आणि प्रसिद्ध असा कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची चर्चा देश भरात होते. आणि या कार्यक्रमात बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली. आणि यात जिनिलिया मराठीत उखाणा घेतानाचे दिसून आलं. हा संपूर्ण कार्यक्रमाचा प्रोमो झी मराठीने प्रदर्शित झाल आहे.

चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा प्रोमोमध्ये रितेश आणि जिनिलिया दोघांनी हजेरी लावली. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळेने तिला उखाणा घ्या अस सांगितला असता, जिनिलियाने लाजत उखाणा घेत जिनिलिया म्हणते, “जोडी आमची जमली, जमले ३६ गुण रितेश रावांचं नाव घेते; देशमुखांची सून,” असा सुंदर उखाणा घेताना दिसली, दरम्यान तिचा मराठीत दमदार उखाणा घेताच अनेकजण अवाक् झाले. असा प्रमो झी मराठीवर प्रदर्शित झाल्याचे दिसून आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रेया घोषालने शेअर केला मुलाचा फोटो

कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का, 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश