सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपाकडे बहुमत असताना देखील त्यांना हार पत्करावी लागली आहे.
सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. दिग्विजय सुर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने व चार उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यामुळे आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वाक्याची आठवण विरोधकांना करुन दिली जात आहे. ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ या वाक्याचा आज प्रत्यय आला असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांकडून सांगितलं जात आहे.
Comments
Loading…