in

देवेंद्र फडणवीसांवर तृतीयपंथीयाशी संबंध असल्याचा आरोप; आरोपीवर तडीपाराची कारवाई

विधानसभेत आक्षेपार्ह पोस्टचा विषय सुरु असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी अशी माहिती विधानसभेत अजित पवार यांनी दिली होती. यानंतर आता आरोपी युवराज दाखले याला पुण्यातील वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्यावर थेट तडीपारीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

युवराज दाखले याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटं आश्वासन देऊन त्याच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते’, असा वादग्रस्त आरोप केला होता. या संदर्भात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सदस्य कोमल शिंदे यांनी फिर्याद दिली होती.

दरम्यान विधानसभेत हा मुद्दा चर्चेत आला असता अजित पवारांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं.आश्वासनानंतर अवघ्या काही तासांमध्ये युवराज दाखलेला पिंपरी-चिंचवडमधून वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेअर मार्केटमध्ये घसरण

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : पोलिसांवर विश्वास नाही का, अनिल परब यांचा फडणवीसांना सवाल