in

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : गृहमंत्री कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत? फडणवीस यांचा सवाल

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लोबोल केला आहे. गृहमंत्री कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करीत आहेत. तो कोण आहे, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणात अनेक योगायोग पाहायला मिळतात. एवढे योगायोग हिंदी चित्रपटातही नसतात. सर्व घटना ठाण्याशी निगडीत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्कॉर्पिओ गाडी ठाण्याची आहे. तिच्याबरोबर आणखी एक गाडी आली, तीही ठाण्याचीच होती. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन हे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, तेही ठाण्याचे आणि हिरेन यांचा मृतदेह सापडला तो मुंब्रा खाडीत, ती देखील ठाण्यातच आहे, असे फडणवीस म्हणाले.
स्कॉर्पिओ गाडी मनसुख हिरेन यांनी विकत घेतल्याची नोंद पोलिसांकडे असतानाही गृहमंत्री सांगतात की, ही गाडी हिरेन यांच्याकडे दुरुस्तीकरिता आली होती. त्यांचे बिल न चुकवल्यामुळे त्यांनी ती आपल्याकडे ठेवून घेतली होती. गृहमंत्र्यांच्या उत्तरात एवढी विसंगती का, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
हे सर्व पाहता या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तो कोण आहे, असा सवाल करून फडणवीस यांनी हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा आजचे सोन्याचे भाव

हिंगणघाटच्या ‘निर्भया’ला न्याय कधी मिळणार ? देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सवाल