in

नैतिकता असेल तर शेतकऱ्यांना पॅकेज घोषित करा – देवेंद्र फडणवीस

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर संबंध देशात राजकीय पडसाद उमटताना पाहायला मिळता आहेत. या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. या घटनेचा देशातील सर्व विरोधी पक्षांनी निषेध केला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने या बंदला विरोध दर्शवला असून यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करता बंद करताना व्यापार्यांना धमक्या दिल्या आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंदमुळे मविआ सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बांधावर जाऊन मदतीची आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेत विरली.

आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. कारण याच मंडळींनी मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचं आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का. खरंतर लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार त्यावर कारवाई करत आहे. हा बंद हा त्या घटनेबाबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी नाही आहे तर त्यावर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने केलेला बंद आहे. म्हणूनच लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे. मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करून, धमक्या देऊन राज्यातील लोकांना बंद पाळण्यासाठी भाग पाडलं जात आहे. तसंही हे बंद सरकार बंद सरकार आहे. योजना, अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश सुरू असताना महाराष्ट्र बंद केला होता. आता काही सुरू होत असताना सरकारने बंद पुकारला, असा टोला फडणीवस यांनी लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

Happy Birthday Amitabh Bacchan यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?