in

पवार साहेब सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाही’;आता फडणवीसांचे प्रत्युत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पवार म्हणाले मी मुख्यमंत्री होतो ते लक्षात नाही, यावर आता फडणवीस म्हणाले, मी सलग 5 वर्षे होतो ना? असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन शरद पवार यांनीही चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. मी ही चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षानंतर सलग पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले पण ते सलग पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. मात्र त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी दोन वर्षे, कधी दीड वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहता आलं, असे ते म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, मला एका गोष्टीचं यावेळी समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालीय. हीच माझ्या कामाची पावती आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sinhagad Express सोमवारपासून धावणार

IPL 2021: दिल्लीची ‘शॉ’नदार सुरूवात