in

फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंडांना संधी, मलिकांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण मिळालं असून याप्रकरणी आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणामुळं राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच नवाब मलिकांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) एकापाठोपाठ एक आरोप करत नवनवे दावे केले. हे सत्र थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचलं होतं. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यातील ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

यावेळी बनावट नोटा, बनावट पासपोर्ट, बांगलादेशी नागरिकांना संरक्षण अशा अनेक प्रकरणांचा दाखला देत मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेला रियाझ भाटी देवेंद्र फडणवीसांसोबत जेवण कसा घ्यायचा?,’ असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी अंडरवर्ल्डमधील काही लोकांना व कुख्यात गुंडांना खुलेआम संरक्षण दिलं होतं. त्यांना सरकारमधील पदं दिली होती, असा आरोप मलिक यांनी केला. रियाझ भाटी याचं नाव घेत मलिक यांनी फडणवीसांचे अंडरवर्ल्डच्या लोकांशी संबंध असल्याचं ते म्हणाले. ‘रियाझ भाटी याला विमानतळावर दोन पासपोर्टसह पकडण्यात आलं होतं. हे अत्यंत गंभीर प्रकरण होतं. मात्र, त्या प्रकरणात रियाझ भाटी दोन दिवसांत सुटला. कारण, फडणवीसांचं त्याला संरक्षण होतं. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व देवेंद्र फडणवीस यांच्या डिनर टेबलवरही रियाझ भाटी दिसायचा. रियाझ भाटी याचे दाऊद व इतर टोळ्यांशी संबंध असल्याचं सर्वांना माहीत होतं. हा रियाझ भाटी सध्या फरार आहे. तो फडणवीसांच्या इतका जवळचा कसा?,’ असा सवाल मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 • या सगळ्यामध्ये योगायोग असा की त्यावेळी डीआरआयमध्ये समीर वानखेडे हेच होते – नवाब मलिक
 • पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कोणी जात असल्यास संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही. पंतप्रधान मोदी मुंबईत आले असताना त्या कार्यक्रमातही तो होता. तो तिथं कसा पोहोचला? – नवाब मलिक
 • फडणवीसांनी पूर्णपणे राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले होते. रियाझ भाटी कोण आहे? हा बनावट पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला होता. दाऊद आणि इतर टोळ्यांशी ह्याचे संबंध असल्याचं सर्वांना माहीत होतं. दोन पासपोर्टसह हा पकडला जाऊनही दोन दिवसांत सुटला. हा भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि फडणवीसांच्या डिनर टेबलवर दिसायचा – नवाब मलिक
 • हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. त्याची दुसरी बायको बांगलादेशी आहे. त्या व्यक्तीला फडणवीस यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष कसा बनवला? – नवाब मलिक
 • इमरान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ. याच हाजीला फडणवीसांनी भाजपमध्ये आणले आणि अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवले. त्याचा हा लहान भाऊ – नवाब मलिक
 • बनावट नोटांच्या प्रकरणात कोणी पकडला गेला तर काँग्रेसवर बिल फाडायचं असंही ठरलं होतं – नवाब मलिक
 • पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात मिळतात. गुन्हा दाखल होतो, पण लगेच जामीनही मिळतो. प्रकरण एनआयएला दिलं जात नाही हा काय प्रकार आहे? कारण यातील सूत्रधारांना भाजपचं संरक्षण होतं – नवाब मलिक
 • ८ ऑक्टोबरच्या प्रकरणात मुंबई व पुण्यात अटका झाल्या. इमरान आलम शेख, रियाझ शेख आणि नवी मुंबईतही एकाला अटक झाली. पण ८ लाख ८० हजार पकडल्याचं सांगून प्रकरण दाबलं गेलं – नवाब मलिक
 • ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी झाली. बनावट नोटा संपवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं सांगितलं गेलं. या निर्णयानंतर बनावट नोटा पकडल्या जाऊ लागल्या. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीतील एका छाप्यात १४ कोटी ५६ लाख किंमतीचे बनावट नोट पकडले गेले. हे प्रकरण फडणवीसांनी दाबलं – नवाब मलिक
 • देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात विदेशातून फोन यायचे. पोलीस त्यावरून प्रकरण सेटल करायचे – नवाब मलिक
 • तुमच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रात खंडणी उकळण्याचं काम सुरू होतं की नाही? – नवाब मलिक
 • नागपूरमधील कुख्यात गुंड मुन्ना यादव याला फडणवीसांनी कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष कसा बनवला? – नवाब मलिक
 • १४ वर्षे एखादा अधिकारी मुंबईत राहतो, यामागे काय गुपित आहे?; नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा
 • एनसीबीकडून निर्दोष लोकांना फसवलं जात असल्याविरोधात आणि खंडणीखोरीविरोधात मी लढाई लढत होतो. पण देवेंद्र फडणवीस यांनी ती भरकटवण्याचा प्रयत्न केला – नवाब मलिक

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात तक्रार

मलाला युसुफझाई लग्नबंधनात; बर्मिंगहॅममध्ये केले लग्न