in

‘पडळकरांना विशेष पोलीस संरक्षण द्या’, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे.

गोपीचंद पडळकर हे सध्या मुंबईत आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केल्याचं समजत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather update | पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस

स्वाभिमानी नेते तुपकर पोलिसांच्या ताब्यात, सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी केलं होतं आंदोलन