in

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने हेल्थ वर्कर म्हणून घेतली लस; माहिती अधिकारात उघड..

रुपेश होले | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी हेल्थ वर्कर म्हणून लस घेतल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन यादव यांनी ही माहिती मागवली होती. मात्र तन्मय फडणवीस खरेच हेल्थ वर्कर आहेत ? की त्याच्याकडे हेल्थ वर्करचा बनावट ओळखपत्र आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तन्मय फडणवीस याने 13 मार्च रोजी सेव्हन हिल्स रूग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला होता. या संबधित फोटो तन्मयने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर एकच वादंग माजला होता. 45 वर्षावरील नागरिक तसेच फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाला राज्यात परवानगी असताना 25 वय वर्ष असलेल्या तन्मय फडणवीसने लस घेतलीच कशी असे सवाल सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांना विचारत भाजपवर टीका करण्यात येत होती.

दरम्यान तन्मय फडणवीस याने लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन ओळखपत्र दाखवून लस घेतल्याची माहिती माहीती अधिकारात उघड झाली आहे.बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन यादव ही माहिती मागवली होती. यामध्ये त्यांना वरील माहिती मिळाली आहे. मात्र तन्मय फडणवीस खरेच हेल्थ वर्कर आहेत ? की त्याच्याकडे हेल्थ वर्करचा बनावट ओळखपत्र आहे ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

“तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. लस जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे.” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पिंपरी चिंचवडमध्ये ऑक्सिजन टॅंक लिक

Sushant Singh Rajput | रुह जुडे, जुडी रेह जाये… म्हणतं सुशांतच्या आठवणीत क्रिती सेनन भावुक