in

Ramnavmi | अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमी परिसरात भक्तांना बंदी

Hindu devotees carry a huge idol of Hindu god Rama as they participate in a religious procession to mark ‘Ram Navami’ festival in Hyderabad, India, Tuesday, April 8, 2014. Ram Navami celebrates the birthday of Rama. (AP Photo/Mahesh Kumar A.)

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती उद्धभवली आहे. दिल्ली ६ दिवसांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे श्री राम जन्मभूमी परिसरात प्रभू रामांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. मात्र या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल, अससे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून सांगण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs RR Live Score | चेन्नईचा राजस्थानवर रॉयल विजय

मुंबईत अपुऱ्या लससाठ्याच्या अभावी लसीकरण केंद्र बंद