in

पाहा ‘एवढ्या’ कोटींच आहे सुपरस्टार धनुषचे घर…

तमिळचा सुपरस्टार आणि रजनीकांतचा जावई अशी धनुषची ओळख . मात्र फक्त ही ओळख न ठेवता त्याने ”वाय धीस कोलावेरी डी” हे गाणं म्हणत संपूर्ण देशातच अक्षरशा वेड लावलं. या गाण्याप्रमाणेच रंझाना या चित्रपटाच्या यशानंतर फक्त रजनीकांतचा जावई अशी ओळख न राहता सारेच त्याला धनुष म्हणून ओळखू लागले.

आपल्या गाणी आणि अभिनयाप्रमाणेच धनुष त्याच्या आलिशान घरामुळे देखील चर्चेत असतो .धनुषच्या आलिशान घराचे काही फोटो समोर आले आहेत. आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी धनुषने बरीच मेहनत घेतली आहे. धनुषचं खरं नाव वेंकेटेश प्रभू कस्तूरी राज आहे. धनुष ७२ कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.

धनुषला पर्यावरणाची आवड असल्याने त्याने संपूर्ण घरात तशीच छोटे छोटे रोपं लावली आहेत. झाडांची आवड असणाऱ्या धनुषने घरात देखील लाकडी फ्लोरींग केलेली आहे. घरामध्ये सकारत्मक्ता टिकवून ठेवण्यासाठी घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी धनुषने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

धनुषन आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हे २००४ साली दोघे विवाहबंधनात अडकले. त्याच्या दोन्ही मुलांची नावे यत्र आणि लिंगा असे ठेवले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाची छडी : राज्यातील अनेक निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह

देशात सोने झाले स्वस्त