‘रेहना है तेरे दिल मै’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या दिया मिर्झाच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा आणि वैभव रेखी लग्नबंधनात अडकले. दिया मिर्झाचा पती वैभव रेखी मुंबईतील पाली हिल भागात राहतो. ज्या इमारतीमध्ये दिया मिर्झा राहते, त्याच इमारतीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या गार्डनमध्येच त्यांचं लग्न झालं. परंतु या लग्नाच्या फोटोमध्ये दिया आणि वैभव रेखी यांच्यासोबतच आणखी एका व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे त्यांचे लग्न एका महिला भटजी.
फोटोमधील महिला भटजींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या स्वत: मंत्र म्हणून यज्ञात हवन करत आहेत. या महिला भटजींचे नाव आहे शीला अत्ता. दीया मिर्झाने ट्विटरवर लग्नाचा फोटो शेअर करत शीला अत्ता यांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले की, या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की आपण समाजातील बदलांचे भागीदार बनू शकतो. स्त्री-पुरूष समानता. असा हॉशटॅग देखील दिला आला.
नववधू रुपातील दिया मिर्झा लाल रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत असून पतीसोबत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिया मिर्झाचा पती बिझनेसमॅन असून तो फायनेंशियल इंवेस्टमेंटचंही काम करतात.
Comments
Loading…