in

साराचा बोल्ड लूक पाहिलात का?

अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाने आणि सौदर्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सारा अली खान जास्त सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

नुकताच साराने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले असून तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या फोटोमध्ये साराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून हे फोटो शेअर करत ‘काश कभी यूं हो न हसरतें न जुनून हो, तेरा खयाल हो और तु हो दिल में बस सुकून हो।’, असे कॅप्शन दिले आहे.

साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. साराच्या या फोटोला १५ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

सारा आता लवकरच ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सारासोबत विकी कौशलसुद्धा दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आदित्य धर करणार आहे. यासोबतच सारा सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषही आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Olympics | मीराबाई चानूचे घर पाहाल तर डोळे पाणावून जातील

Mumbai Local | लोकलसंबंधी येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील