देशात पेट्रोल- डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका होत आहेत. त्यात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनोख्या पद्धतीनं इंधन दरवाढीचा विरोध केला आहे. ममता बॅनर्जी यांनी बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरवरून प्रवास करून इंधन दरवाढीचा निषेध केला आहे.
ममता दीदींनी नेहमीप्रमाणे गाडीतून प्रवास न करता आज स्कूटरच्या मागे बसून आपल्या कार्यालयात पोहचल्या. यावेळी, ममता दीदींची स्कूटर मंत्री फिरहाद हकीम चालवत होते आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसल्या होत्या.ममता दीदी ज्या स्कूटरवर बसल्या होत्या ती बॅटरीवर चालणारी स्कुटर होती. या स्कूटरवरून आपल्या कार्यालयापर्यंत प्रवास करून त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला. विशेष म्हणजे यावेळी ‘तुमच्या तोंडात काय आहे? पेट्रोल दरवाढ, डिझेलची दरवाढ आणि गॅसची दरवाढ’ असा लिहिलेला एक फलकही ममता दीदींनी आपल्या गळ्यात परिधान करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवला.या दरम्यान मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री दोघांनीही नियमानुसार, हेल्मेटही परिधान केलं होतं. तसंच दोघांनीही कोरोनाचे नियम पाळत मास्कचाही वापर केला होता.इंधन दरवाढीविरोधात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेले हे आंदोलन सध्या चर्चेत आहे. दरम्यान येत्या काही दिवसांतच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यामुळे राजकीय वातावरण तापत चालल आहे.
Comments
Loading…