in ,

डिझेल दराने ओलांडली शंभरी

सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शनिवारी लिटरमागे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे 30 आणि 35 पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलसोबत डिझेलच्या दरानेही 100 रुपयांची पातळी ओलांडली. डिझेलच्या किमतीत शंभरी पार करणारे मुंबई हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

इंधन दरवाढीचे सत्र सुरू असल्याने सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले. त्यामुळे पेट्रोलचा दर दिल्लीत 103.84 रुपये, तर मुंबईत 109.83 रुपये इतका झाला आहे. मुंबईत आता एक लिटर डिझेलसाठी 100 रु. 29 पैसे मोजावे लागणार असून दिल्लीत डिझेल 92.47 रुपयांवर पोहोचले आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे देशाच्या अनेक भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने पहिल्यांदा शतकाची वाट धरली आहे.

सार्वजनिक कंपन्यांनी मागील महिन्यातील तीन आठवडे दोन्ही इंधनांच्या दरांत बदल केला नाही. त्यानंतर 24 सप्टेंबरपासून डिझेल, तर 28 सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून पेट्रोल 2 रुपये 65 पैशांनी, तर डिझेल 3 रु. 85 पैशांनी महागले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेस आक्रमक : केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सोमवारी देशभरात ‘मौन व्रत’

‘चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखानं झोपलाय’