in

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यादरम्यान त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली.

दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या सांगण्यावरून एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. तूर्तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. गतवर्षी 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Shivrajyabhishek Din 2021 live| आज 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा

‘चिमणी गिधाडांना भारी पडली’