in

पोलीस महासंचालक म्हणतात, पूजा चव्हाण प्रकरणात फार काही बोलता येणार नाही, पण…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असताना, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहेत. त्यात आता या प्रकरणावर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी तपासाविषयी सर्व गोष्टी जाहीर करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

हेमंत नगराळे म्हणाले, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हे आत्महत्येचे असून, अशा प्रकरणांमध्ये पोलीस नेहमी गुन्हा मानूनच तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील तपासाविषयी मला सर्व गोष्टी जाहीर करता येणार नाहीत. मात्र, पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पोलिसांचा तपास हा तथ्यावर चालतो, जर तरच्या शक्यतांवर पोलीस तपास चालत नाही, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी असे कोणतेही भाष्य करणार नाही, ज्याच्यावरुन तुम्ही नवे अंदाज बांधाल, असे नगराळे यांनी म्हटले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या, केंद्र सरकार कडून नव्या गाईडलाईन्स जारी

वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता : मुंबईतील ओव्हल मैदान आज सायंकाळपासून बंद