in

किरण माने प्रकरणावर दिग्दर्शक समीर विद्वांसचे ट्वीट चर्चेत

अभिनेता किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून काढून टाकण्यात आले. अशी माहिती किरण माने यांनी स्वत: दिली आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की, “माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात एका महिलेने तक्रार केली होती त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आलं”, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहे.

दरम्यान या प्रकरणावर दिग्दर्शक समीर विद्वंसने एक ट्विट केलं आहे आणि हे ट्विट आता चर्तेत आलं आहे. दिग्दर्शक समीर विद्वंसने ट्विट करुन सांगितले की, कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये कोणाचेही नाव नव्हते परंतु त्याचा संबंध भाजप समर्थकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी जोडला. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. यासर्व प्रकरणानंतर त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे समजते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Indian Army Day 2022 : आज भारतीय सैन्य दिवस

आशयघन ‘आश्रय’ चित्रपटाचं पोस्टर झालं लाँच