लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे कृषीमंत्री असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र, वाचून दाखवले होते. पण त्याबाबतचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी हा खुलासा केला. शरद पवार यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला पंतप्रधानांनी दिला होता, त्याबाबतचे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिले. या पत्राचा एक भागच पंतप्रधानांनी वाचून दाखवला. पण शरद पवार यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करूनच राज्यांनी त्यावर विचार करावा, असे म्हटले होते, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना या मुद्यावर प्रतिवाद करू शकले असते. पण आमची ती संस्कृती नाही. त्यामुळे मी आता त्याला उत्तर देत आहे, असेही त्यांनी सुनावले.
Comments
Loading…