लोकशाही न्यूज नेटवर्क
बंगळुरुतील २२ वर्षीय दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. टुलकीट प्रकरणातील मुख्य कारस्थानी असल्याचा दिशावर आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान, विरोधकांकडून याप्रकरणावरून टीका केली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिशा रवीला तिच्या घरातून प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. ‘टूलकिट गुगल डॉक्युमेंट’ तयार करण्यात आणि ते प्रसारित करण्यात दिशाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक केली असल्याचा पोलिसांचा दावा आहे. न्यायालयाने दिशा रवीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिशाचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आाल आहे.
स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं आपल्या टि्वटरवर कथित टूलकिट प्रसारित केलं होतं. परंतु, नंतर तिने ते काढून टाकले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, टूलकिट गुगल डॉक्युमेंटचं संपादन दिशा हिनं केलं होतं. ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात दिशाचा मोठा वाटा होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
Comments
Loading…