in

Watch Video:शेतीवरून वाद;दोन गटात तुंबळ हाणामारी

बीडच्या गेवराई तालुक्यात शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. शेत जमिनीच्या बांधावरुन हे भांडण झालं असून तिघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारात सविताबाई यांची जमीन असून या रस्त्यावरून सविताबाई यांच्या मुलांनी शेतात ऊस लागवडीसाठी ट्रँक्टरमधून बेणे नेले. दरम्यान तुम्ही रस्त्यावरून ट्रँक्टर का नेले, असं कारण पुढं करत शेजारच्यांनी वाद घालत भांडण करायला सुरुवात केली. किरकोळ भांडनाचे पर्यावसन तुफान हाणामारीत झालं. काठ्या कुऱ्हाडीने थोरात बंधूसह त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली. यामध्ये अनुराज याला डोक्यात कुऱ्हाडीचा गंभीर घाव लागल्याने तो रक्तबंबाळ झाला आहे. या घटनेत सविताबाई थोरात, अनुराज थोरात आणि केशव थोरात असे तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra State Electricity| उद्यापासून महावितरणची थकबाकी वसुली

राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन विशेष | …आणि शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले!