in

टीम इंडियाच्या ‘गब्बर’चा घटस्फोट

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखऱ धवन आणि पत्नी आयशाने घटस्फोट घेतला आहे

नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

शिखऱ धवन आणि आयशाच्या घटस्फोटामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

आयशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे.

आयशाने आपल्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक भावनिक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये आयशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत.

“जोपर्यंत मी दोन वेळा घटस्फोटित झाले नाही तोपर्यंत घटस्फोट हा खूप घाणेरडा शब्द असल्याचं मला वाटत होतं. शब्दांचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे,” असं ती म्हणते.

“मी घटस्फोटित म्हणून याआधी याचा अनुभव घेतला होता. जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला मी खूप काही चुकीचं करत असल्याचं वाटत होतं,” असं आयशाने म्हटलं आहे.

“मी प्रत्येकाला निराश करत असून स्वार्थी असल्याचंही वाटत होतं,” असं आयशा म्हणते. “मी माझ्या कुटुंबाला, मुलांना आणि काही प्रमाणात देवालाही निराश करत असल्याची भावना जाणवत होती. घटस्फोट हा किती घाणेरडा शब्द होता,” असंही तिने सांगितलं आहे.

पोस्टमध्ये पुढे तिने म्हटलं आहे की, “मग आता विचार करा, मला दुसऱ्यांदा यामधून जावं लागत आहे. हे भयानक आहे”. “याआधीही माझा घटस्फोट झाला असून दुसऱ्या वेळी माझं खूप काही पणाला होतं असं वाटत होतं. मला खूप काही सिद्ध करायचं होतं. पण जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हाही भीती वाटली. पहिल्यांदा ज्या भीती, अपयश आणि निराशा या भावना होत्या त्या पुन्हा तशाच आल्या”, असं आयशाने सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गुगलचं भन्नाट फीचर! आता विना इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येणार सर्व फाईल्स

तालिबानच्या सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सीआयए प्रमुखांनी घेतली अजित डोवाल यांची भेट