लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता नववर्ष २०२१ मधील दिवाळी मुंबईकरांसाठी अधिक आनंदी असणार आहे. कारण मुंबईत म्हाडाकडून सर्वसामान्यांसाठी घरांची बंपर लॉटरी काढण्यात येईल. म्हाडातर्फे निघणाऱ्या बंपर लॉटरीसाठी सज्ज व्हा, दिवाळीत मुंबई म्हाडाकडून तब्बल ४ हजार घरांची सोडत काढली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात म्हाडाला सर्वसामान्य नागरिकाला परवडणारी घरे देण्याचे काम सोपविण्यात आले असून नववर्षातील येत्या दिवाळीत म्हाडा मुंबई मंडळाकडून सामान्य नागरिकांसाठी ही दिवाळीची विशेष भेट असणार आहे. दरम्यान, मुंबई म्हाडा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवाळीत ४००० घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये फक्त मुंबईतील गोरेगावमध्ये ३ हजार ४०० म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात येणार असल्याने मुंबईत घर घेणाऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Comments
Loading…