in

पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो; कोरोना टास्क फोर्स

राज्याची राजधानी मुंबईसहीत संपूर्ण राज्यामध्येच बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली. राज्यामध्ये कोरोनामुळे झालेल्या ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांमध्ये झाले. कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर राहुल पंडित यांनी राज्यामधील कोरनाबाधितांच्या संख्येमध्ये होणाऱ्या वाढीसंदर्भात चिंता व्यक्त केलीय. मागील दोन आठवड्यांमध्ये गंभीर प्रकरणं आणि मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे पंडित यांनी सांगितले.

“क्रिटीकल केसेस आणि मृत्यूचं प्रमाण मागील ७ ते १४ दिवसांमध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर वाढलं आहे,” असं सांगतानाच पंडित यांनी पुढील १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भातील अंदाज बांधता येईल असं म्हटलं आहे. पुढील दहा दिवस मुंबई शहरासाठी करो या मरो अशापद्धतीचे असतील असे संकेत देताना पंडित यांनी बुधवारी जवळजवळ दोन महिन्यानंतर आमच्या रुग्णालयामधील आयसीयू बेडसंदर्भातील विचारणा वाढल्याची माहिती दिली.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी २१ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. “करोनाची प्रकरणं आणि पॉझिटीव्ही रेटमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ सहा टक्क्यांची आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत आणि जम्बो कोव्हिड सेंटर्सला बेडची सोय तयार ठेवण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्य आहेत,” असंही काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

टास्क फोर्समधील सदस्य असणाऱ्या डॉक्टर शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील १० दिवसांमध्ये राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येणार की नाही हे ठरेल. “करोना रुग्णांची वाढ यंदा विदर्भामधून सुरु झाली आहे. या रुग्णवाढीमध्ये नवीन करोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असं म्हणता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिलीय. तसेच ज्या लोकांना आधी करोनाचा संसर्ग झाला नव्हता आता ते अधिक फिरु लागल्याने करोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली आहे अशी शक्यताही जोशी यांनी व्यक्त केलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल-डिझेलच्या किंमती निम्म्यापर्यंत येणार? पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत

अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची मतदारांना मारहाण