in ,

होळी घरात पेटवायची का? – राम कदम

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याबद्दल नियमावली जारी करण्यात आली आहे. कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. हाच प्रार्दुभाव पाहता होळी आणि रंगपंचमी या सणावर राज्य सरकारनं निर्बंध आणले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर भाजप प्रवक्ते राम कदम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राम कदम यांनी सवाल उपस्थित केला आहे की, हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतेय होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही. तर मग काय घरात पेटवायची?, राम कदम यांनी ट्विट करुन हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का?, असा संतप्त सवालही राम कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

राम कदम यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की, हिंदू विरोधी #ठाकरेसरकार म्हणतेय #होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही.तर मग काय घरात पेटवायची ? लोक #रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत #होळी पेटवली .आणी हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का? याशिवाय ते असेही म्हणाले की, अन्य धर्मांना तातडीने परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात काय? , असंही ते म्हणालेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“होळी रे होळी शिमग्याची पोळी” तळकोकणातील शिमगोत्सव

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार आहे की मुस्लिम लीगचं ? , म्हणतं भाजपा नेत्यांचा हल्लाबोल