in

चिपी विमानतळाचे उद्घाटन लपून-छपून नको,भाजपचा चिमटा

समीर महाडेश्वर, सिंधुदुर्ग | येत्या 9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याआधीच राजकारण तापू लागले आहे. दरम्यान या उद्घाटन सोहळ्याआधीच भाजपने शिवसेनेला चिमटा काढला आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम बंद खोलीत लपून-छपून नको, तर सगळ्यांना सामावून घेवून करा, अशी विनंती वजा आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे. सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चिपी विमानतळाचे उद्घाटन हा जिल्हावासियांसाठी आनंदोत्सव आहे. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम बंद खोलीत लपून-छपून नको, तर सगळ्यांना सामावून घेवून करा, अशी विनंती वजा आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केले. दरम्यान अशा कार्यक्रमात स्थानिक सरपंचाना डावलणे म्हणजे दुर्दैव आहे. परिसरातील साधा रस्ता सुध्दा झाला नाही, पाणी नाही, मग या विमानतळाचे श्रेय घेणारे गेले कुठे ? असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी १ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार असून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे गेल्या महिन्यातील वादंगानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chipi Airport: चिपी विमानतळाची निमंत्रण पत्रिका आली समोर…,नारायण राणेंचे नाव

राजस्थान रॉयल्ससमोर १७२ धावांचे आव्हान