in

ड्रीम्स मॉल आगडोंब : 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे पालिका उपआयुक्तांना आदेश

भांडुप येथे ड्रीम्स मॉल व त्यात तिसऱ्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयामध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीच्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपआयुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांना चौकशी करण्यास सांगितले आहे. तसेच याबाबतचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई अग्निशमन दलात कामकाजाचा अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन उपआयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांच्याकडे ही चौकशी सोपविली आहे. रहांगदळे यांनी अहवाल सादर करताना विविध मुद्दे विचारात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती (licence) देण्यात आल्या होत्या का, याची पडताळणी करणे, त्याची पूर्तता झालेली नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे, अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक/व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक/व्यवस्थापन यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का ते शोधून काढणे, अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य त्या शिफारशी सुचवणे आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus : महापौर म्हणतात, मुंबईत कोणत्याही क्षणी नाइट कर्फ्यू!

दीपाली आत्महत्या : संतप्त महिलांची आरोपी विनोद शिवकुमारविरोधात घोषणाबाजी