in

देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; चौघे बुडाल्याची भीती

औरंगाबाद : सचिन बडे | नातेवाईकांची भेट आणि देवीच्या दर्शनासाठी मुळगावी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाडसावंगी जवळील बंधाऱ्यात कार कोसळून त्यात चारजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात लाडसावंगी-जडगाव रोडवरील चारठा गावाजवळ झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचे चारठा येथील वैद्यनाथ चौधरी हे औरंगाबाद येथे राहतात. गावातील नातेवाइक राजू वाघ यांची भेट आणि देवीचे दर्शन यासाठी वैद्यनाथ चौधरी, त्यांची पत्नी मंगल चौधरी, सून मंगल चौधरी आणि इतर एकजण कारमधून औरंगाबाद येथून निघाले. लाडसावंगी-जडगाव मार्गे ते गावाकडे जात होते.

दरम्यान, गावाजवळील बंधाऱ्याजवळ अरुंद रस्ता आहे. यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार बंधाऱ्यात कोसळली. या बंधाऱ्याचे नुकतेच खोली करण्याचे काम झाले आहे. यामुळे किमान ५० ते ६० फुट खोल पाण्यात कार बुडाली आहे. ग्रामस्थ, पोलीस आणि अग्नीशमन दल यांचे मदत कार्य सुरु आहे. अद्याप कोणाचाही शोध लागू शकला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मला कोणतीही नोटीस आली नाही – रवी राणा

अमिताभ यांना नात आराध्याने दिल्या शुभेच्छा; एश्वर्याने केला फोटो शेअर