in

आयडियाची कल्पनाच; नाशिकमध्ये ड्रोनद्वारे केली सॅनिटायझरची फवारणी

नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. त्यात आता शहर ड्रोनद्वारे सॅनिटायझ करण्याचा प्रयोग राबवण्यात आला. त्यामुळे अनोख्या प्रयोगाची जिल्ह्यात वेगळीच चर्चा आहे.

नाशिक शहरात एकीकडे आजपासून लॉकडाऊन होत असताना दुसरीकडे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर ड्रोनच्या मदतीने सॅनिटायझर फवारणी केली जात आहे. पंचवटी येथील रविवार कारंजा परिसरात प्रायोगिक तत्त्वावर प्रशासनाच्या वतीने हा प्रयोग करण्यात आला. जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरातल्या कंटेंटमेंट झोन, बाजारपेठ,स्लम परिसर अशा सर्वच भागांत हा प्रयोग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा राज्यातला पहिलाच असा प्रयोग असल्याने नाशिकमध्ये याची चर्चा जास्त रंगू लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokshahi Impact;लोकशाहीच्या बातमीनंतर प्रशासन जागे; ऑक्सिजन टँकर मिरजमध्ये दाखल

Maharashtra Lockdown; महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊनवर एकमत – राजेश टोपे