in

गोव्याला जाणाऱ्या प्रवाशाकडे सापडला सहा किलोंचा चरस

खेड – शिवापुर टोलनाक्याजवळ पोलिसांनी घेतलं ताब्यात

रूपेश होले
मुंबई क्रूझचे ड्रग्ज प्रकरण ताजे असतानांच राजगडमध्ये गोव्याला जाणाऱ्या प्रवाशाकडे सहा किलोंचा चरस सापडण्याची घटना घडली आहे. यावेळी राजगड पोलिसांनी कारवाई करून भोर तालुक्यात 32 लख 26 हजार किमतीचा चरस जप्त केला आहे.

राजगड पोलिस्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना मुंबईहून गोव्याकडे डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या बस मधुन गोव्याला जाणाऱ्या एका प्रवास्याकडे 6 किलोंचा चरस आहे, अशी गुप्त बातमी मिळाली. या आधारे पोलिस निरीक्षक आणि एपीआय नवसारे यांच्या पथकाने चतुराईने संपळा रचून पहाटे 5.40 वाजता आरोपीला ताब्यात घेतलं.

आरोपी मूळचा नेपाळचा असून त्याचे नाव मुस्ताकी रजाक धुनिया असे आहे. त्याच्यावर NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईच्या विमानतळाबाहेरील गर्दी नियंत्रणाबाहेर, अनेकांची झाली फ्लाईट मिस

गुगल करणार ‘हा’ मोठा बदल