in ,

केरळमध्ये भाजपाकडून ई. श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!

ई श्रीधरन, भाजपा, केरळ भाजपा मुख्यमंत्री उमेदवार, ई श्रीधरन भाजपा मुख्यमंत्री उमेदवार, केरळ निवडणूक, e sreedharan, bjp, Kerala BJP Chief Ministerial candidate, E Sreedharan BJP Chief Ministerial Candidate, keral election,

केरळमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मेट्रोमॅन ई श्रीधरन हे भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. तशी अधिकृत घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे केरळच्या निवडणुकीमधील रंगत वाढली आहे.

भाजपाने आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे. केरळमध्ये भाजपाची सत्ता आल्यास मेट्रोमॅन ई. श्रीधरन केरळचे मुख्यमंत्री असतील. 88 वर्षांचे ई. श्रीधरन यांनी गेल्याच आठवड्यात भाजपामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती.

केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणे हे आपले मुख्य उद्दीष्ट असल्याचे श्रीधरन यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले होते. भाजपाने निवडणुकीत यश मिळवले तर, मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास आपण तयार आहोत, असेही श्रीनिवास यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे देशाचे मेट्रोमॅन अशी ओळख असलेल्या ई. श्रीधरन यांच्या कुशल नेतृत्वामुळे देशभरातली अनेक महत्त्वाकांक्षी रेल्वे आणि मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास आली आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली सध्या केरळमध्ये विजय यात्रेच्या माध्यमातून धडाक्यात प्रचार सुरू आहे. केरळच्या राजकारणाचा विचार करता तिथे मागच्या अनेक वर्षांपासून डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. तर, काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता श्रीधरन यांचा भाजपाला किती फायदा होणार हे निकालानंतर दिसेलच.

कोण आहेत ई. श्रीधरन?
सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सुधारण्यासाठी ई. श्रीधरन यांचा जगभरामध्ये लौकिक आहे. श्रीधरन यांच्या नेतृत्वात दिल्ली मेट्रोचे स्वप्न साकार झाले. कोलकाता, कोचीसह अनेक शहरांच्या मेट्रोसाठी त्यांचे योगदान आहे. कोकण रेल्वेसारखा अवघड प्रकल्प श्रीधरन यांच्या कौशल्यामुळे पूर्णत्वास आला. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाले असून भारत सरकारकडून पद्मविभूषण, पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. 2003मध्ये टाइम मॅगझिनकडून ‘आशियाज हीरो’ या नामावंतांच्या यादीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तानमधील सिनेट निवडणुकीत इम्रान खान यांना झटका, मंत्री अब्दुल हफीज शेख पराभूत

कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी एसओपी लागू , अजित पवारांची मोठी घोषणा