जलप्रलयानंतर आता उत्तराखंडला भूकंपाचा धक्का बसला आहे. दुपारी साडे चारच्या सुमारास हे धक्के बसले. उत्तराखंडमधील पित्तोरगढमध्ये हे धक्के सर्वाधिक जाणवले आहेत. 4.0 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानीचे किंवा संपत्तीचे नुकसान झाल्याचा कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.
उत्तराखंडच्या देवभूमीत 7 फेब्रुवारीला पुन्हा एकदा महाभयंकर जलप्रलयाने हाहाकार उडाला. चमोली जिल्ह्यातील तपोवनच्या जोशी मठ परिसरात हिमकडा तुटून ऋषिगंगा नदीत कोसळला. या नदीचा प्रवाह पुढे रैणी गावात धौलीगंगा नदीत मिसळला. त्यामुळे धौलीगंगा नदी अक्राळविक्राळ रूप धारण करून वादळाच्या वेगाने वाहू लागली. या महापुराचा प्रवाह इतका जबरदस्त होता की मार्गातील तपोवन धरण, बोगदा, आसपासच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Comments
Loading…