लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत शुक्रवारी रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात १० वाजून १३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंप झटके इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.१ नोंदवली गेली असून या भूकंपामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूकंपाचे धक्के फक्त भारतातच नव्हे तर शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही जाणवले. ताजिकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी होती. काही मिनिटातच तिथे भूकंपाचे २ धक्का बसले आणि हे धक्के बराच काळ जाणवले.
२४ तासांत दुसर्यांदा भूकंप
राजस्थानच्या बीकानेरमध्ये आज ४.३ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू बीकानेरच्या वायव्येकडे ४२० किलोमीटर अंतरावर होते. हा भूकंप भारतीय वेळेनुसार सकाळी ८.०१ वाजता झाला.
भारतीय उपखंडात विनाशकारी भूकंप यापूर्वी झाले आहेत. २००१ च्या गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या भूकंपात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारत दरवर्षी सुमारे ४७ मिलिमीटरच्या वेगाने आशियाला धडकत आहे. टेक्टॉनिक प्लेट्स धडकल्यानंतर भारतीय उपखंडात वारंवार भूकंप होत असतात. भूगर्भातील पाण्याच्या कमतरतेमुळे टेक्टॉनिक प्लेट्स धडकण्याचा वेग कमी झाला आहे.
Comments
Loading…