in ,

अनिल देशमुखांच्या नागपुरातील हॉटेलवर ईडीची छापेमारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीची टांगती तलवार कायम आहे.काल म्हणजे ६ ऑगस्टला त्यांच्या महाविद्यालयावर ईडीने छापेमारी केली होती.तर लगेच आज त्यांच्या वर्धा रोडवरील ट्राय हॉटेलवर दुपारच्या सुमारास ईडीने छापा टाकला.त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घरावर छापा टाकला होता.१६ जुलै रोजी ईडीने अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती.

यानंतर शुक्रवारी पुन्हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केल्यानंतर नागपुरमध्ये असलेल्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजवर ईडीने छापा टाकला.आज देखील त्यांच्या हॉटेलवर ईडीने छापा टाकला आहे. चौकशीसाठी समन्स बजावून हजर राहत नसल्याने ईडीने छापासत्र चालविल्याची चर्चा रंगली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बजरंग पुनियाला हरियाणा सरकारकडून २.५ कोटी, सरकारी नोकरी आणि बरचं काही…

Neeraj Chopra| नीरज चोप्रा भालाफेकमध्ये अव्वल… भारताच्या खात्यात पहिलं ‘सुवर्ण’