कर्नाटकातील एका उद्योगपतीच्या बंगल्यावर ईडीनं छापा टाकला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गोवा हद्दीतील एका बंगल्यावर ईडीनं ही कारवाई केली. संबंधित घराची २ तासांपासून झडती घेतली जात असून याबाबत गुप्तता पाळली जात आहे. कर्नाटकातील एका उद्योगपतीचा हा बंगला असल्याचं बोललं जात आहे. खाण घोटाळ्याच्या संबंधित ही कारवाई असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
कर्नाटकातील एका उद्योगपतीचं हे फार्महाऊस आहे. बंगळुरू येथील ईडीच्या पथकानं छापा टाकून झाडाझडती सुरू केली. स्थानिक पोलिसांना याची माहिती नसल्याचं समोर आलं आहे. कारवाईत काय हाती लागलं, हे अद्याप समजू शकलं नाही.
Comments
Loading…