in

महाविकास आघाडीशी संबंध असलेल्यांवर छापा टाकला जातोय

महाविकास आघाडीशी संबंध असलेल्यांवर छापा टाकला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे.त्यासोबत शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणावर ते बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीशी संबंध असलेल्यांवर छापा टाकला जात असल्याचे म्हटले आहे.

शिवसेनेला टार्गेट केलं जातयं, शिवसेनेच्या मंत्री आणि नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई सुरू आहे. अशा कारवाईने शिवसेनेचे मनोध्यैर्य खचणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. सुडाची भावना आणि बीनबुडाचं राजकारण यामुळे कारवाई सुरु आहे.

सगळ्याचे दिवस येतात, दिल्लीत आमचे देखील दिवस येतील, लोकांना सगळं कळतं असतं, ‘ये पब्लिक सब जाणती है’, असे राऊत म्हणाले. तुम्ही खणलेल्या खड्यात स्वत:चं पडाल, ED आणि भाजपची हात मिळवणी असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकल प्रवासाबाबत उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल

“ठाण्यात रोखलं, तर दादरमध्ये दहीहंडी साजरी करू”